मुंबईला खूप मोठा पारंपरिक वारसा लाभला आहे. पण वारसा स्थळ म्हणजे काही केवळ स्मारके किंवा इमारती नव्हेत. वारसा या शब्दाची व्याप्ती आता वाढली असून त्यामध्ये आता 'जिवंत वारसा' (लाइव्ह हेरिटेज) अशी संकल्पना आली आहे. यात दुर्मीळ वनस्पती किंवा वृक्षसंपदेचा समावेश होतो. मुंबईत असे काही वृक्ष आहेत जे केवळ एकमेवाद्वितीय आणि अतिशय दुर्मीळ आहेत. काही आलेत ऑस्ट्रेलियाहून, काही आफ्रिकेतून तर काही इतर देशांतून... त्यात आहे एक चॉकलेटचं झाड!